
रत्नागिरी शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात झालेल्या ‘हिट अँड रन’ अपघातात ‘सहेली ब्युटी पार्लर’च्या संचालिका सुनीता राजेश साळवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लाला कॉम्प्लेक्स येथील रस्त्यावर हा अपघात झाला. सुनीता साळवी या रस्त्यावर पडल्या असताना, राजीवडा येथील एका तरुणाने आपली भरधाव होंडा सिटी कार त्यांच्या अंगावरून नेली. या अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणावर हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























































