
गणपतीपुळे येथे झालेल्या घरफोडीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा २ लाख ३६ हजार २०० रूपयाचा ऐवज लंपास केला होता. जयगड पोलिसांनी शिताफीने चोरट्यांना पाच तासात जेरबंद केले.
फिर्यादी वीरेंद्र शांताराम गोसावी हे गणपतीनिमित्त गावी गेले होते. याचा फायदा घेऊन दोन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून मौल्यवान दागिने व काही रोख रक्कम लंपास केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना चोरीची घटना समजताच त्यांनी कोणताही विलंब न लावता दोन पथके तयार करून शोध सुरू केला. अवघ्या 5 तासात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. हैदर इजाज पठाण (रा. महाड) आणि रोशन सुरेश जाधव (रा. मेडे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपीकडे अधिक चौकशी केली असता हैदर इजाज पठाण हा सराईत गुन्हेगार असल्याच्या निदर्शनात आले. हैदर पाठाण याच्यावर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात जवळपास 10 ते 12 गुन्हे असल्याची माहिती उघड झाली.
दरम्यान, ही कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी पोलीस उप विभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर यांच्या मार्गदर्शना खाली सहा पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक दीडपसे, सहा. पोलीस उपनिरीक्षक अनिल गुरव, पोलीस हवालदार राहुल घोरपडे, मिलिंद कदम, मंदार मोहिते, निलेश भागवत, संतोष शिंदे,संदेश मोंडे, सायली पुसाळकर, निलेश गुरव, पवन पांगरीकर,आदित्य अंकार यांनी ही कामगिरी केली