
वर्षभरामध्ये मुदत संपत असलेल्या वा संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका घेण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील 101 पैकी 51 ग्रामपंचायतींची प्रशासनाकडून प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्यातून, ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे वातावरण आतापासून तापू लागले आहे.
वर्षभरामध्ये मुदती संपत असलेल्या वा संपलेल्या ग्रामपचायतींच्या निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातून, निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रभाग रचना निश्चित करण्याचा कार्यक्रम महसूल प्रशासनाकडून जाहीर केला आहे. त्यामध्ये तालुक्यातील कारवली, निवेली, पांगरीखुर्द, शिवणेखुर्द, कोंडसर बुद्रुक, गोठणेदोनिवडे, करक, चिखलगाव, राटपाटण, शिळ, पांगरे बुद्रुक, तुळसवडे, पन्हळेतर्फ सौंदळ, फुपेरे, सोलगाव, तारळ, अणसुरे, मंदरूळ, महाळुंगे, येरडव, काजिर्डा, ससाळे, पडवे, हातदे, सौंदळ, वाडापेठ, कोदवली, तळगाव, आडवली, आंबोळगड, चुनाकोळवण, दळे, जवळेथर, कशेळी, परटवली, मोसम, मोरोशी, मिळंद, गोवळ, कोंडीवळे, ताम्हाणे, वाल्ये, धोपेश्वर, ओणी, दोनिवडे, हरळ, ओशिवळे, कुंभवडे, कोळंब, कुवेशी, उन्हाळे अशा 51 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 13 एप्रिलपर्यंत हरकती दाखल करायच्या असून दाखर झालेल्या हरकतींवर 21 एप्रिलला सुनावणी होणार आहे. या सुनावणीचा निकाला वा अभिप्राय प्रांताधिकार्यांकडून 23 एप्रिलला जिल्हाधिकार्यांना सादर केला जाणार आहे. दरम्यान, तालुक्यात होत असलेल्या 51 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीच्या अनुषंगाने इच्छुकांसह राजकीय पक्षांनी आतापासून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. त्यातून, गावा-गावातील राजकारण आतापासूनच तापले आहे.




























































