रत्नागिरी – सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू, 2281 पालकांनी दिली संमतीपत्रे

नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग उद्या सोमवारपासून सुरू होणार आहेत. सुरक्षिततेच्या पार्श्भूमीवर जिल्ह्यातील 2 हजार 519 शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यामध्ये चार शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले.शाळा उद्यापासून सुरू होणार असून पालकांची संमतीपत्रे येऊ लागली आहेत.आजपर्यंत 2 हजार 281 पालकांनी संमतीपत्रे दिली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली.त्यामध्ये 1053 शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली तर 1538 शिक्षकांची अॅन्टीजेन चाचणी घेण्यात आली.याचाचणीत संगमेश्वर तालुक्यातील तीन आणि खेड तालुक्यातील एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडला.शाळेत सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य आहे.विद्यार्थ्यांची संख्या आणि आसनव्यवस्था लक्षात घेऊन सकाळ आणि दुपार सत्रात शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय व्यवस्थापनाने घ्यायचा आहे असे शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी सांगितले.

सर्वाधिक संमतीपत्रे दापोलीतून
जिल्ह्यातील नववी,दहावी,अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्रे घेण्यात येत आहेत.आजपर्यंत 2 हजार 281 पालकांनी संमतीपत्रे दिली आहेत.त्यामध्ये सर्वाधिक संमतीपत्रे दापोलीतून आली आहेत.दापोलीतून 400 संमतीपत्रे,मंडणगडातून 245 संमतीपत्रे,खेडमधून 322 संमतीपत्रे,चिपळूणातून 293 संमतीपत्रे,संगमेश्वरातून 397 संमतीपत्रे,गुहागरातून 338 संमतीपत्रे,रत्नागिरीतून 60 संमतीपत्रे,लांजातून 109 संमतीपत्रे,राजापूरातून 117 संमतीपत्रे जमा झाली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या