
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील रस्त्यालगच्या चपलांच्या दुकानाला शनिवारी रात्री अचानक आग लागली. नगरपरिषदेच्या अग्निशमन यंत्रणेने आग विझवली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चप्पल, बूट जळून खाक झाले.
साळवी स्टॉप येथे तंबू उभारून चपलांचे दुकान टाकण्यात आले होते. शनिवारी रात्री या दुकानाला बाहेरून लावलेल्या कापडाने पेट घेत आग भडकली.काही क्षणात दुकानातून आगीचे लोळ येऊ लागले. आग विझविण्यासाठी नगरपरिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले.आग विझविण्यात आली असून दुकानातील चप्पल जळून खाक झाल्या.
























































