रत्नागिरी – भाट्ये खाडीत बुडून दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहराजवळील भाट्ये खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार कोकण नगर, रत्नागिरी येथे राहणारा प्रणय जाधव (24) व रेहान शेख (11) हि दोन मुले भाट्ये पुलाखाली पोहण्यासाठी उतरली. या ठिकाणी समुद्राचे पाणी खाडीत येण्याचा मार्ग असल्याने वाळू कापली जाते व अचानक खोल खड्डा तयार होतो. नेमके याच ठिकाणी ही दोन मुले पोहण्यासाठी उतरली व बुडाली. त्यांच्यासोबत गेलेल्या एका मुलाने आरडओरडा केल्यावर आजूबाजूच्या परिसरात जाळे विणत असणाऱ्या मच्छिमारांनी धाव घेत या दोघांना बाहेर काढले व जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र पोटात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेबाबत माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या दोन लहान मुलांच्या मृत्यूमुळे कोकण नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.