
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यात जवळचे नाते आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड स्टार्सबरोबर विवाह केला आहे. तर काही जणांचे नाते फक्त गॉसिपींग पुरतेच राहिले आहे. आता या गॉसिपींगमध्ये अजून एका जोडप्याच्या नावाची भर पडली आहे. हे दुसरे तिसरे कोणी नसून टीम इंडियाचे प्रशिक्षक व माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि अभिनेत्री निमरत कौर आहेत. रवी शास्त्री सध्या निमरतला डेट करत असल्याची चर्चा आहे.

निमरतने इरफान खानबरोबर ‘लंच बॉक्स’ मध्ये आणि अक्षय कुमार बरोबर ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटात काम केले आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार 36 वर्षीय निमरत व 56 वर्षीय रवी शास्त्री गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आपल्यातील हे नातं मात्र या दोघांनी सिक्रेट ठेवल आहे. या दोघांना कधी कोणीही एकत्र बघितल्याचं ऐकीवात नाही. पण 2015 साली एका जर्मन लक्झरी कारच्या उद्धाटन सोहळ्यात या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर या दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू त्याच रुपांतर प्रेमात झाल्याची चर्चा आहे, असं स्पॉटबॉयच्या बातमीत म्हटलं आहे. त्याआधी 2012 साली रवी शास्त्री यांनी लग्नाच्या 22 वर्षानंतर पत्नी रितु सिंह यांना घटस्फोट दिला होता. तेव्हापासून ते एकटेच राहत आहेत. तर निमरतही अविवाहित आहे. शास्त्री सध्या इंडियन टीमबरोबर इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. तर निमरत सध्या एका वेबसीरिजच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत.
summary-ravi-shashtri-dating-this-actress






























































