अश्विनचा बळींचा विक्रम

500 बळी घेणारा अश्विन हिंदुस्थानचा दुसराच गोलंदाज आणि दुसराच फिरकीवीरसुद्धा ठरला आहे. हिंदुस्थानकडून बंगळुरूच्याच अनिल कुंबळेने 619 बळी मिळविले आहेत.

रविचंद्रन अश्विनने अखेर आपल्या कसोटी बळींचे सुपरफास्ट पंचशतक पूर्ण केले. 98 वी कसोटी खेळत असलेल्या अश्विनने जॅक क्राऊलीची विकेट घेत कमी कसोटीत 500 विकेट पूर्ण करण्याचा विक्रम केला. कसोटी इतिहासात 500 विकेट घेणारा अश्विन जगातला नववाच गोलंदाज असून त्याने मुरलीधरन वगळता अन्य सातही गोलंदाजांपेक्षा कमी कसोटीत विकेटचा 500 चा आकडा गाठला आहे. या सातही गोलंदाजांनी 105 पेक्षा अधिक कसोटी खेळत हा पराक्रम केला होता, तर मुरलीधरनने 87 कसोटी सामन्यांत 500 विकेट पूर्ण केल्या होत्या. तो विश्वविक्रम अबाधित राहिला आहे. सध्या खेळत असलेल्यांमध्ये अॅण्डरसन (696), नॅथन लायन (517) हेच अश्विनच्या पुढे आहेत.