राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रचारार्थ रावसाहेब दानवे यांच्या जाहीर सभा

555

जालना विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय
मंत्री रावसाहेब दानवे येणार आहेत. गुरूवारी 10 ऑक्टोंबर रोजी विविध ठिकाणी ते जाहीर सभा घेणार आहेत.

राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या विजयासा’ठी आपण स्वतः मतदारांपर्यंत जाणार असल्याची घोषणा दानवे यांनी महायुतीच्या महामेळाव्यात केली होती. त्यामुळे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून सभांचे जोरदार नियोजन केले आहे. गुरूवारी सकाळी 10 वाजता गोलापांगरी, 11 वाजता रामनगर, दुपारी 4 वाजता वाघ्रुळ व सायंकाळी 5 वाजता चंदनझिरा या ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. या वेळी उमेदवार राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार संतोष दानवे,गोदावरी महामंडळाचे उपाध्यक्ष भास्करराव आंबेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, ओमप्रकाश चितळकर,भानुदासराव घुगे, भास्करराव दानवे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत,रामेश्वर भांदरगे, अशोक पांगारकर,अतिक खान, आयेशा खान, गणेशराव रत्नपारखे, गणेश मोहिते, सतीश जाधव, भाऊसाहेब घुगे, अ‍ॅड.भास्कर मगरे,जि. प.सदस्य बबनराव खरात, पंचायत समिती सभापती पांडुरंग डोंगरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
.

आपली प्रतिक्रिया द्या