रायन ग्रुप ऑफ स्‍कूल्‍सकडून नववीपर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी ई-लर्निंगची सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनने मॉन्‍टेसरी ते सध्‍याच्‍या इयत्ता दहावी व बारावीपर्यंतच्‍या सर्व विद्यार्थ्‍यांसाठी ई-लर्निंग वर्गांची सुविधा दिली आहे. इयत्ता दहावी व बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे आणि लॉकडाऊन मुळे व्‍हर्च्‍युअल एज्‍युकेशन मॉड्यूलमध्‍ये बदल करण्‍यात आले आहेत. एज्‍युटेक सॉफ्टवेअरच्‍या साहाय्याने व्हिडिओ कॉन्‍फरन्सिंग सुविधांच्‍या माध्‍यमातून सर्व विद्यार्थी व शिक्षकांना एकत्र आणण्‍यात येणार आहे. व्‍हर्च्‍युअल क्‍लासरूमचा अनुभव मिळण्‍यासाठी हे सॉफ्टवेअर खासरित्‍या डिझाइन करण्‍यात आले आहे. लवकरच ग्रेड मॉन्‍टेसरी व पूर्व-प्राथमिक ते इयत्ता नववीपर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी ई-लर्निंग क्‍लासेसची सुविधा देण्‍यात येणार आहे.

रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्‍सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारीश्री. रायन पिंटू म्‍हणाले, ”रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्‍सअंतर्गत असलेल्‍या सर्व शाळा सरकारच्‍या सूचनांचे पालन करत तात्‍पुरत्‍या कालावधीसाठी बंद करण्‍यात आल्‍या आहेत. इयत्ता दहावी व बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांचे नवीन शैक्षणिक वर्ष आमच्‍या ई-लर्निंग क्‍लासरूम मॉड्यूलच्‍या माध्‍यमातून ऑनलाइन सुरू करण्‍यात आले आहे. आम्‍ही लवकरच पूर्व-प्राथमिक ते इयत्ता नववीपर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी आमची ई-लर्निंग प्रोग्राम सुविधा विस्‍तारित करणार आहोत. रायन ग्रुपमधील प्रत्‍येकजण या आव्‍हानात्‍मक स्थितीला आमचे विद्यार्थी व पालकांसाठी मेहनत घेत आहे. आमचे इन-हाऊस एडटेक अॅप सुसज्जित आहे. हे अॅप विद्यार्थी व शिक्षकांमध्‍ये दररोज ऑनलाइन व्हिडिओ कम्‍युनिकेशनची सुविधा देण्‍यासोबत ई-लर्निंग प्रोग्राम देणार आहे.”