फोनपे लिमिटेडला 21 लाखांचा दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे लिमिटेडला 21 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रीपेड इन्स्टमेंट (पीपीआय) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने ही कारवाई केली आहे. केंद्रीय बँकेने ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2024 पर्यंतच्या फोनपेच्या ऑपरेशन्सची चौकशी केली. यामध्ये कंपनीने एस्क्रो अकाउंटमध्ये व्यापाऱ्यांकडून आलेले पे कमी दाखवले होते.