
गोल्ड लोनसाठी आरबीआयने नव्या नियमांची घोषणा केली आहे. हे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील. नव्या नियमानुसार, 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या गोल्ड लोनसाठी आता इन्कम पुराव्याची गरज नाही. अडीच लाखांपर्यंतच्या गोल्ड लोनसाठी 85 टक्क्यांपर्यंत लोन व्हॅल्यू मिळणार आहे. याआधी ही मर्यादा 75 टक्के होती. यापुढे केवळ गोल्डवर नव्हे तर चांदीच्या दागिन्यांवरसुद्धा लोन मिळेल, तसेच चांदीच्या सिक्क्यांवर कर्ज देण्यात येणार आहे.