चेंबूरमध्ये सात बांगलादेशींना अटक

हिंदुस्थानात बेकायदेशी घुसखोरी करून चेंबूरच्या माहुल गाव येथे लपून राहणाऱया चार बांगलादेशी नागरिकांना आरसीएफ पोलिसांनी पकडले. त्यात तीन पुरुष व चार महिलांचा समावेश आहे.

माहुल गावात सात बांगलादेशी नागरिक मार्च 2020 पासून लपून राहत असल्याची माहिती आरसीएफ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे धडक देऊन सोहंग मुल्ला (26), जाहिदुल ईमुल (26), नोयम शेख (25), आलामीन शेख (23), सोमा तुटुल (24), तावमीना राजू (35) आणि सलमा अली (35) अशा सात जणांना पोलिसांनी पकडले.हे सर्व हिंदुस्थानात घुसखोरी करून मुंबईत येऊन राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे.