
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला बंडखोरीचा फटका बसला आहे. उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाच्या माजी नगरसेविका अस्मिता चवंडे, भाजपचे माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या भावजय मैथिली मयेकर आणि कामना बेग यांनी आज उमेदवारी अर्ज भरले आहेत.
शिंदे गटाच्या माजी नगरसेविका अस्मिता चवंडे यांच्या प्रभाग क्र.१५ अ मधील जागा भाजपच्या वर्षा ढेकणे यांना सोडल्याने अस्मिता चवंडे नाराज झाल्या. आज त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.प्रभाग क्र.१२ अ मध्ये भाजपचे माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या भावजय मैथिली देवेंद्र मयेकर इच्छुक होत्या. मात्र ही जागा शिंदे गटाला सोडल्याने नाराज झालेल्या मैथिली मयेकर यांनी बंडखोरी करत आज उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रभाग क्र.९ मध्ये भाजपच्या कामना बेग यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बं करत आज उमेदवारी अर्ज भरला आहे.
प्रहार जनशक्ती आणि आप रिंगणात
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष आणि आम आदमी पक्षही रिंगणात उतरले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोन उमेदवारांनी आणि आपच्या ६ उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी आणि एका उमेदवाराने नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आहे.




























































