चमचमीत रेसिपी – कॉर्न पॅटीस 

5493

साहित्य – 2 कप स्वीट कॉर्न, उकडलेले 3 मध्यम बटाटे, 2 ब्रेडचे स्लाईस, 1 टीस्पून आले किसलेले, 3 हिरव्या मिरच्यांची पेस्ट, 2 लहान कांदे, 1/2 टीस्पून जिरे, 1/4 कप कोथिंबीर बारीक चिरून, 1 टेस्पून मैदा, 1/2 कप पाणी, चवीपुरते मीठ.

कृती – बटाटे सोलून पुस्करून घ्यावे. ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करावे आणि ते बटाटय़ात घालावे. दीड कप कॉर्न मिक्सरमध्ये अगदी भरड वाटावेत. उरलेले 1/2 कप कॉर्न अख्खेच मिक्स करावेत. कांदा बारीक चिरून घ्यावा. कॉर्नच्या मिश्रणात कुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, मिरची पेस्ट, आले, जिरे, कोथिंबीर, चिरलेला कांदा, आणि मीठ घालावे. मिक्स करून घ्यावे. तयार मिश्रणाचे 18 ते 20 मध्यम आकाराचे पॅटीस बनवावे. पॅटीस गोल आणि चपटे बनवावेत. पॅटीस एकावर-एक रचू नयेत. अर्धा-पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवावे.अर्ध्या तासाने पॅटीस फ्रीजमधून बाहेर काढून 10 मिनिटे बाहेर ठेवावे. कढईत तेल गरम करून मिडीयम आचेवर पॅटीस तळून घ्यावी. जेव्हा पॅटीस तळणीत सोडाल तेव्हा 20-25 सेकंद त्याला डिस्टर्ब करू नकात. एक बाजू थोडी तळली गेली की मगच झाऱयाने बाजू बदलावी. दोन्ही बाजू सोनेरी रंगावर तळाव्यात. तळलेले पॅटीस टिश्यू पेपरवर काढावेत. पुदिना चटणी किंवा टॉमेटो केचपबरोबर सर्व्ह करावेत.

आपली प्रतिक्रिया द्या