
रेल्वे भरती बोर्डने टेक्निशियन पदांच्या एकूण 6 हजार 238 पदांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्याची अखेरची डेडलाईन 7 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. याआधी ही डेडलाईन 28 जुलै 2025 पर्यंत ठेवण्यात आली होती, परंतु नंतर या भरतीला मुदतवाढ मिळाली होती. टेक्निशयन ग्रेड 1 (सिग्नल) 183 पदे (लेवल-5) आणि टेक्निशियन ग्रेड-2 6055 पदे (लेवल2) ही पदे भरली जाणार आहेत. सविस्तर माहिती वेबसाईट www.rrbapply.gov.in वर देण्यात आली आहे.