
स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) मार्फत 2 हजार 423 जागांची भरती केली जाणार आहे. दहावी, बारावी आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 2 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 23 जून 2025 पर्यंत आहे. या भरतीअंतर्गत फायरमन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, टेक्निकल ऑफिसर पदांसह भरती केली जाणार आहे. सविस्तर माहिती https://ssc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.