
सामना ऑनलाईन । मुंबई
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. एकूण 4,738 शिक्षकांची पदे भरली जाणार असल्याचे त्यांनी ट्वीटद्वारे दिली. तसेच अध्यापक भरतीही आता थेट होणार असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यामुळे नवीन भरतीसाठी उत्सुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
Recruitment orders for 4738 teaching and non teaching positions have been approved for senior colleges across the state. Furthermore, the remuneration for the teachers on clock hour basis, has been doubled per the newly issued directive.
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 2, 2018
राज्यात एकूण 4738 पदांसाठी भरती होणार आहे. अध्यापकांच्या 3580 जागा, प्रयोगशाळा सहाय्यकांच्या 856 जागा, ग्रथपालांच्या 163 जागा आणि शारिरीक शिक्षण संचालयनातल्या 139 जागा भरल्या जाणार आहेत.
म्हणून रखडली शिक्षक भरती
दरम्यान, याआधी राज्यातील बहुतांश संस्थाचालक ऑनलाईन शिक्षक भरतीविरोधात न्यायालयात गेल्याने भरती रखल्याचे तावडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात म्हटलं होतं.




























































