
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात फरिदाबाद येथील अल-फलाह मेडिकल कॉलेजची चौकशी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने (NAAC) अल-फलाह विद्यापीठाला त्यांच्या वेबसाइटवर चुकीची मान्यता दाखवल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
NAAC ने जारी केलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की अल-फलाह विद्यापीठ NAAC द्वारे मान्यताप्राप्त नाही किंवा त्यांनी सायकल 1 साठी अर्ज केलेला नाही असे आढळून आले आहे. असे असूनही, विद्यापीठाने त्यांच्या वेबसाइटवर दावा केला आहे की त्यांच्या तीन संस्थांना NAAC द्वारे ‘A’ ग्रेड देण्यात आला आहे. दरम्यान, अल-फलाह विद्यापीठा दिल्ली दहशतवादी मॉड्यूलशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.




























































