पोटाची ढेरी कमी करायचीय… मग उभे रहा!

3217
belly-fat-12

शरीराचे वजन काही केल्या कमी होत नाही… पोटाची ढेरी पण वाढतच आहे… आता काळजी नको फक्त उभे राहिल्याने वाढणाऱया वजनापासून मुक्ती मिळेल, असे एका संशोधनातून समोर आले आहे. उभे राहिल्याने जास्त कॅलरीज बर्न होते याला आहारतज्ञांनीही दुजोरा दिला आहे.

मेयो क्लिनिकच्या संशोधकांनी हा अभ्यास केला असून ‘युरोपिअन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी’मध्ये तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. संशोधकांनी याआधी वाढत्या वजनाविषयी झालेल्या 46 संशोधनाचा आधार घेतला. या संशोधनातील एकूण 1,184 व्यक्तींच्या माहितीच्या आधारे त्यांनी हा अभ्यास केला. या व्यक्तींचे सरासरी वय 33 आणि सरासरी वजन 65 किलो होते, असे या संशोधनाच्या अभ्यासिका Dr Fajdrwane Saeieddiedfard यांनी सांगितले. ‘व्हीएलसीसी’च्या अध्यक्षा वंदना ल्युथरा यांनी सांगितले, ‘लोकांना आपल्या लठ्ठपणामुळे विविध आजार आणि अडचणींना सामोरे जावे लागते. वजन कमी करण्यासाठी केवळ आहाराच्या पद्धती आणि पदार्थ बदलून अथवा टाळून चालणार नाही, तर त्यासाठी उभे राहणे हादेखील उत्तम उपाय आहे.

उभे राहिल्याने हे होते

–  प्रतिमिनिटाला 0.15 अधिक कॅलरीज घटतात.

– व्यक्तीचे वजन 65 किलो असेल तर दररोज प्रत्येकी 6 तास उभे राहिल्यास 54 कॅलरीज घटू शकतात.n म्हणजेच त्या व्यक्तीचे वर्षाला अडीच तर  4 वर्षांनी 10 किलो वजन घटू शकते.

–  भरपूर वेळ उभे राहणे कुणालाच आवडत नाही. ज्यांचे काम बैठे आहे त्यांना तर उभे राहणे शक्य होत नाही. मात्र ज्या व्यक्ती दिवसाला 12 तास बसतात ते 6 तास उभे राहिले, तर त्यांना याचा फायदा नक्कीच होईल.

आपली प्रतिक्रिया द्या