
गोवळ गावचे शेतकरी गौरव महेश परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलीसांनी सत्यजीत चव्हाण व नितीन जठार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली आहे.
आपल्या गोवळ येथील खासगी जागेत एमआयडीसी अधिकार्यांकडून सर्वेक्षण सुरू असताना सत्यजीत चव्हाण, नितीन जठार यांनी अन्य काहींना जमा करून लाठ्या काठ्या घेऊन आपल्या शेतात येऊन सर्वेक्षणाचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच सर्वेक्षण करणार्या अधिकारी व कर्मचार्यांना धक्काबुक्की करुन काम करण्यापासून रोखून त्यांना गोवळ येथे कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच आपणाला शिवीगाळ करून धमकी दिली अशा आशयाची तक्रार गोवळ गावचे शेतकरी गौरव परांजपे यांनी राजापूर पोलीसांत दिली होती. पोलीसांनी या प्रकरणी तातडीने दखल घेत सत्यजीत चव्हाण व नितीन जठार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या दोघानांनही नोटीसही बजावण्यात आल्याचे परबकर यांनी सांगितले.



























































