पुढील सूचना मिळेपर्यंत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेल, एक्प्रेस, पॅसेंजर ट्रेनसह मुंबईतील लोकल सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद राहतील, असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर 23 मार्चपासून देशभरातील मालवाहूतक वगळता सर्व रेल्वे सेवा बंद आहेत. त्यानंतर फक्त विशेष मेल, एक्प्रेस सुरू करण्यात आल्या. तसेच मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल ट्रेन सुरु करण्यात आल्या. आता पुढील सूचना मिळेपर्यंत सर्वसामान्यांसाठी रेल्वेसेवा बंदच राहणार आहेत.

लॉकडाऊनच्या काळात रेल्वे मंत्रालयाने टप्प्याटप्प्याने रल्वे सेवा बंदची मुदत वाढवली होती. त्यानुसार लोकल ट्रेन आणि मेल-एक्स्पेस गाड्या 12 ऑगस्टपर्यंत बंद राहतील, असे आदेशात म्हटले होते. त्यामुळे मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता पुढील सूचना मिळेपर्यंत सर्वसामान्यांसाठी मेल, एक्सप्रेस, पॅसेजर आणि लोकल सेवा बंद राहणार आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या 230 विशेष रेल्वे आणि अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठी मुंबईत सुरू असलेल्या लोकल सुरूच राहणार आहेत. तसेच गरज भासल्यास आणखी विशेष ट्रेन किंवा लोकल सुरू करण्यात येतील. मात्र, पुढील सूचना मिळपर्यंत सर्वसामान्यांसान्यांसाठी मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि लोकलव सेवा बंदच राहणार आहे.