पाकिस्तानी लष्कराला बूट पॉलिश करणारा पंतप्रधान हवाय!

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

‘पाकिस्तानची सत्ता ही कायम लष्कराच्या हातात राहिलीय. पाकिस्तानी लष्कराला त्यांचे बूट पॉलिश करणारी व्यक्तीच पंतप्रधान म्हणून हवी आहे. त्यामुळेच सध्या इम्रान खानपेक्षा चांगली व्यक्ती त्यांना मिळू शकत नाही’, असे वादग्रस्त वक्तव्य इम्रानची माजी पत्नी रेहम खान हिने केले आहे. रेहम खानने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे. या मुलाखतीत तिने पाकिस्तानी लष्कराने इम्रानवर दाखवलेला विश्वास देखील औटघटकेचा ठरणार असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान याच्या ‘तहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाला सत्तेची ‘लॉटरी’ लागली असून या पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक ११९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता इम्रान खान हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या तख्तावर विराजमान होणार आहे. इम्रान खानने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या असून इम्रानला पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे.

रेहम खानने याआधी देखील इम्रानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. इम्रानचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असून त्याची देशाबाहेर देखील पाच मुले असल्याचा आरोप रेहमने केला होता.

SUMMARY : REHAM KHAN SAYS IMRAN KHAN IS GOOD BOOT POLISHER

आपली प्रतिक्रिया द्या