तुरुंगात जामीन आणि पैशांअभावी लटकलेल्या कैद्यांना सोडवणार अझीम प्रेमजी

528

>>  आशीष बनसोडे

दररोज कुठल्या न कुठल्या गुह्यात अटक झालेल्या आरोपींची रवानगी तुरुंगात केली जाते. परिणामी आधीच हाऊसफुल्ल असणाऱया कारागृहांमध्ये नव्या आरोपींना अक्षरशः कोंबावे लागते. वकील नाही, जामिनासाठी पैसे नाहीत, जामीनदार नाही… या व अशा अनेक कारणांमुळे बरेच जण आतच राहतात. अशा कैद्यांमुळे ओव्हर क्राऊडिंगची समस्या जटील बनल्याने प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजी यांची संस्था कारागृह विभागाच्या मदतीला आली आहे.

राज्यातील कारागृहे कैद्यांनी सुपरडुपर हाऊसफुल्ल झाली आहेत. ती संख्या कमी होण्याऐवजी दररोज त्यात वाढच होत आहेत. त्यात शिक्षा झालेले कमी, पण अंडर ट्रायल कैद्यांची संख्या सर्वाधिक असते. साध्या गुह्यात अटक झालेले आरोपी तर दररोज आतमध्ये जात असल्याने कैद्यांची संख्या कमी होतच नाही. नव्याने कारागृहात जाणारे किंवा अंडर ट्रायल कैद्यांचा मुक्काम काही कारणास्तव आतमध्ये भरपूर लांबतो. त्यामुळे हाऊसफुल्लची डोकेदुखी होत असल्याने त्यावर उपाय काढण्यासाठी अझीम प्रेमजी फिलनट्रोपिक इनेशिटीव्ह (एपीपीआय) ही संस्था पुढे सरसावली आहे. कारागृहातील अंडर ट्रायल किंवा ज्यांची लगेच सुटका होऊ शकेल अशा कैद्यांची संख्या शक्य तितक्या लवकर कशी कमी करता येईल यासाठी ‘एपीपीआय’च्या आर्थिक व कायदेशीर पाठबळाखाली दिल्लीस्थित नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, प्रयास संस्था आणि वरहाद या तीन संस्था राज्यातील आठ कारागृहांत सध्या काम करीत आहेत. या कामासाठी ‘एपीपीआय’ने कारागृह विभागाशी मोड ऑफ अंडरस्टँडिंगचा करार केला आहे. याचा आतापर्यंत अनेक कैद्यांना फायदा झाला आहे.

समस्या आणि लटकंती

कारागृहात अनेक कैदी असे आहेत की ज्यांना जामीन मंजूर झालाय, पण तेवढे पैसे भरायला नाही, पैसे उपलब्ध होऊ शकतील पण जामीनदार नाही, शुऑरिटी नाही, खटला लढण्यासाठी वकील नाही या व अशा समस्यांमुळे अनेक कैदी तुरुंगात लटकून राहतात. त्यामुळे अशा कैद्यांना आवश्यक मदत करून त्यांना बाहेर काढण्यासाठी ‘एपीपीआय’ काम करीत आहेत.

  • दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, प्रयास आणि वरहाद या संस्था कारागृहातील कैद्यांचा अभ्यास करतात. कुठल्या कारणास्तव कैदी आतमध्ये लटकून पडलाय ती माहिती घेऊन मग त्यानुसार संबंधिताला मदत केली जात आहे. अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबवला जात आहे.
  • ‘एपीपीआय’ आणि कारागृह विभागामध्ये ठरलेल्या एमओयूनुसार टीसचा भाग असलेली प्रयास संस्था आर्थर रोड कारागृह, भायखळा, ठाणे, कल्याण, तळोजा आणि लातूर या सहा मध्यवर्ती कारागृहांत काम करीत आहे. तर दिल्लीस्थित ‘नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी’ पुण्याचे येरवडा आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात काम करीत असून ‘वरहाद’ संस्था अमरावती आणि अकोला कारागृहासाठी काम करीत आहे.
  • बरेच कैदी क्षुल्लक कारणास्तव कारागृहात राहतात. पण त्यांना वेळीच आवश्यक मदत मिळू शकली तर त्यांना बाहेर पडणे शक्य होते. ‘एपीपीआय’च्या माध्यमातून सध्या हे काम आठ कारागृहांत सुरू असून त्यामुळे ओव्हर क्राऊडिंगची समस्या कमी करण्यास मदत मिळेल. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास त्याची व्याप्ती वाढविण्यात येईल, असे एका कारागृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

हे मोबाईल आसन धोक्याचे!

सकाळी जॉगिंग आणि योगा करण्यापेक्षा त्याची छबी मोबाईलमध्ये टिपण्यातच हल्ली तरुणांचा उत्साह ओसंडून वहात असतो. परंतु अशा प्रकारे फोटोसेशन करताना अनेकांना भान राहत नाही. दादर चौपाटी येथील हे दृश्य पहा. हे गटार महापालिकेने धोकादायक ठरवले आहे. शिवाय या दोघांना पोलिसांनी हटकण्याचा प्रयत्नही केला. मात्र मोबाईल कॅमेऱयातील फोटोसेशनचे वेड एवढे आहे की, जिवाचा धोका पत्करून हे अशा प्रकारे फोटोसेशन सुरू होते.

आपली प्रतिक्रिया द्या