रिलायन्स आणि फेसबुक येणार एकत्र, चीनला देणार टक्कर

चीनमधून कोरोनाचा जगभरात प्रसार झाल्याने अनेक उद्योग बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. याचा फायदा हिंदुस्थानला घेता येऊ शकतो. याच दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मार्क झुकेरबर्ग यांच्या फेसबूक यांच्यात टायअप झाल्याचे वृत्त आहे. या दोन बड्या कंपन्या सोबत मिळून व्हॉट्सऍप प्लॅटफॉर्म आणि यूजर बेसचा फायदा घेत चायनीज सुपर-ऍप वी-चॅटला टक्कर देण्यासाठी एक मल्टीपर्पज ऍप बनवण्याच्या तयारीत आहे. दोन्ही कंपन्या मिळून या प्रोजेक्टसाठी फंडिंग, टेक्निकल माहिती आणि डोमेन संबंधी माहिती घेत आहेत.

दै. भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमिवर या ऍपला लाँच करण्यात येणार आहे. यूजर रिलायन्स रिटेल स्टोर्स किंवा jio.com वरुन किराणा किंवा जीवनावश्यक गोष्टी खरेदी करू शकतील. तसेच JioMoney चा उपयोग करुन पेमेंट करू शकतील. हे नवीन ऍप डिजिटल पेमेंट, सोशल मीडिया, गेमिंग, एयर टिकट बुकिंग आणि हॉटेल बुकिंगसारखे करेल.

दरम्यान या एका ऍप्लिकेशनमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला दोन प्रकारचा लाभ देईल. हे ऍप ग्राहक आणि व्यवसायिकांसाठी बीटूसी प्लॅटफॉर्म देण्यासोबतच उपयोगकर्त्यांच्या खर्चाबाबत माहिती देईल. सध्या याचे कमर्शियल प्रयोग सुरू आहेत. या कामासाठी मॉर्गन स्टेनलीला इन्वेस्टमेंट बँकर नियुक्त करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या