रिलायन्‍स ज्‍वेल्‍सच्‍या चमकणाऱ्या डायमंड कलेक्‍शनसह वर्ष 2021 बनवा अधिक खास

reliance-jewels

रिलायन्‍स ज्‍वेल्‍स हा हिंदुस्थानचा आघाडीचा व विश्‍वसनीय दागिन्यांचा ब्रॅण्‍ड त्‍यांचा वारसा अधिक पुढे घेऊन जात आहे आणि रिटेल नेतृत्‍व व नाविन्‍यपूर्ण उत्‍पादनामध्‍ये अग्रस्‍थानी राहिला आहे. नववर्षाची जल्‍लोषात सुरूवात झाली असताना रिलायन्‍स ज्‍वेल्‍स पार्टी व कॉकटेल वेअरसाठी हि-यांच्‍या दागिन्‍यांच्‍या नवीन व फॅशनेबल रेंजसह परतला आहे. हिरे हे मुलींसाठी खास भावना निर्माण करतात आणि प्रत्‍येक स्त्रीची तिच्‍या खजिन्‍यामध्‍ये हि-याचा दागिना असण्‍याची इच्‍छा असते. रिलायन्‍स ज्‍वेल्‍सकडे अद्वितीय हि-यांचे दागिने आहेत, जे तुम्‍हाला आकर्षक व स्‍टायलिश लुक देऊ शकतात. रिलायन्‍स ज्‍वेल्‍स बारकाईने तयार करण्‍यात आलेल्‍या कलाकृतींसह आकर्षक कलेक्‍शन सादर करत प्रत्‍येक स्त्रीच्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण गरजांची पूर्तता करते. हे दागिने फॅशनेबल असून तुमच्‍या पोशाखामध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करतील.

सूर्य, पिके व कापणीमधून प्रेरित हि-यांच्‍या दागिन्‍यांच्‍या या स्‍पेशल कलेक्‍शनसह उत्‍सवी साजरीकरणांमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करा. तुमच्‍या पारंपारिक दागिन्‍यांच्‍या जागी इअररिंग्स, अंगठ्या, ब्रेसलेट्स, पेण्‍डंट्स व नेकलेसेस् अशा समकालीन स्‍टाइल्‍समध्‍ये असलेल्‍या आकर्षक दागिन्‍यांची खरेदी करा. हे कलेक्‍शन भारतभरातील रिलायन्‍स ज्‍वेल्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे. तुम्‍ही रिलायन्‍स ज्‍वेल्‍स शोरूम्‍समध्‍ये देखील खरेदी करू शकता व सोन्‍याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर जवळपास ३० टक्‍के सूट व हि-यांच्‍या दागिन्‍यांवर जवळपास ३० टक्‍क्‍यांची सूट या खास ऑफरचा देखील लाभ घेऊ शकतात. मर्यादित कालावधीसाठी ऑफर आणि अटी व नियम लागू.

या कलेक्‍शनबाबत बोलताना रिलायन्‍स ज्‍वेल्‍सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुनिल नायक म्‍हणाले, ”हे हिरे प्रत्‍येक प्रसंग व हंगामासाठी आहेत. महिला हि-यांचे दागिने परिधान करण्‍याच्‍या ट्रेण्‍डमध्‍ये वाढ होताना दिसण्‍यात आली आहे. विवाहाचा काळ असो किंवा प्रादेशिक कापणी महोत्‍सव आणि कुटुंबासोबत साजरीकरणांचा प्रसंग असो, वर्षाच्‍या या काळादरम्‍यान विविध प्रसंग येतात. आमचा विश्‍वास आहे की, प्रत्‍येक स्त्रीची हे चमकदार कलेक्‍शन स्‍वत:जवळ असण्‍याची इच्‍छा आहे आणि या आकर्षक कलाकृती रंग, शुद्धता, कॅरट व कटच्‍या सर्व मानकांची पूर्तता करतात. समकालीन ग्राहकांच्‍या पुरोगामी आवडी लक्षात घेत डिझाइन्‍स बारकाईने बनवण्‍यात आल्‍या आहेत.”

आपली प्रतिक्रिया द्या