जिओची क्रांती! गिगा फायबर योजना लॉन्च, वाचा काय आहे खास प्लॅन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ म्हणत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने मोबाईल क्रांती केली होती. त्यानंतर केवळ श्रीमंतांना परवडणारा मोबाईल सर्वसामान्यांच्याही मुठीत वावरू लागला. अंबांनी यांनी आता दुसरी क्रांती केली असून प्रकाशाच्या वेगाइतका इंटरनेट स्पीड देणारी जिओ गिगा फायबर योजना लॉन्च करण्यात आली आहे. केवळ 700 रुपयांत 100 एमबीपीएसचा स्पीड मिळणारी ही योजना आजपासून कार्यान्वित होणार आहे.

जिओ फायबरच्या 700 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 एमबीपीएस इंटरनेट स्पीड मिळेल. तर प्रीमियम पॅकचा स्पीड 1 जीबीपीएस असणार आहे. हिंदुस्थानात फिक्स्ड ब्रॉडबँड कनेक्शन डाऊनलोड स्पीड 26.46 एमबीपीएस असून अपलोड स्पीड हा 21.91 एमबीपीएस आहे. तसेच सेवेंतर्गत जिओने मोफत टीव्हीसह विविध प्लॅन्स आणि ऑफरही लॉन्च केल्या आहेत. या प्लॅन्सनुसार ग्राहकांना 1 जीबीपीएसपर्यंत इंटरनेट स्पीड उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या सेवेच्या गोल्ड आणि त्यावरील सर्व प्लॅन्ससाठी 4K स्मार्ट टीव्हीसेटही मोफत मिळणार आहे.

699 रुपयांचा प्लॅन
जिओचा हा बेसिक ब्रॉन्झ प्लॅन असून यामध्ये युजर्सना 100 एमबीपीएसचा स्पीड मिळेल. तसेच अनलिमिटेड डेटा (100 जीबी+ 50 जीबी एक्स्ट्रा) मिळेल. त्याचबरोबर यामध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग मिळेल. यामध्ये युजर्सना देशातील कोणत्याही क्रमांकावर फोन करता येईल.

849 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 एमबीपीएस पर्यंत स्पीड मिळेल. तर अनलिमिटेड डेटा (200 जीबी + 200 जीबी एक्स्ट्रा) मिळेल. यामध्येही युजर्सना मोफत व्हॉईस कॉलिंगचा फायदा मिळेल.

1299 रुपयांचा प्लॅन
जिओच्या 1299 रुपयांच्या गोल्ड प्लॅनमध्ये ग्राहकाला 250 एमबीपीएसचा स्पीड मिळेल. तसेच अनलिमिटेड (500 जीबी + 250 जीबी एक्स्ट्रा) डेटा मिळेल. मोफत व्हॉईस कॉलिंगही मिळेल तसेच ग्राहकाला यात 4K स्मार्ट टीव्ही मोफत मिळेल.

2499 रुपयांचा प्लॅन
हा डायमंड प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकाला 500 एमबीपीएसचा स्पीड मिळेल. तसेच अनलिमिटेड डेटा (1250 जीबी + 250 जीबी एक्स्ट्रा) मिळेल. यातही मोफत व्हॉईस कॉलिंग मिळेल. तसेच यामध्ये ग्राहकाला 24 इंची एचडी टीव्ही मिळेल.

10 हजार रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल 1 GBPS इंटरनेट सेवा मिळणार आहे. यात जियो होम, जियो IOT सारख्या सेवांच्चा समावेश आहे. तसेच जो चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होईल त्याच दिवशी पाहण्याची एक्सक्लुसिव सेवाही या प्लॅनमध्ये मिळणार आहे.

फॉरएव्हर/वेलकम प्लान

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 4 LED टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे.

jio1

ऑनलाइन नोंदणी अशी करा…

जिओ फायबरच्या नोंदणीसाठी https://gigafiber.jio.com/registration येथे करा
कनेक्शन हवे असलेले ठिकाण लिहा.
ठिकाणाचा संपूर्ण पत्ता लिहा.
त्यानंतर ग्राहकाचे नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आदी माहिती भरा.
तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाका आणि सबमिटचे बटण दाबा.
घरबसल्या थिएटरचा अनुभव