जिओचा भन्नाट निर्णय, लॉकडाऊन दरम्यान ‘या’ गोष्टी मिळणार मोफत!

5202

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे सगळी जनता घरात अडकून पडली आहे. याच दरम्यान रिलायन्स जिओने भन्नाट निर्णय घेतला असून याचा कोट्यवधी युजर्सला फायदा होणार आहे. जिओने 17 एप्रिलपर्यंत आपल्या युजर्सला 100 मिनिटांचे कॉलिंग आणि 100 एसएमएस फ्री देण्याची घोषणा केली आहे. युजर्सच्या प्लॅनची वैधता संपली तरी इन्कमिंग कॉल सुरू राहणार आहेत, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. जिओच्या निर्णयानुसार 17 एप्रिलपर्यंत देशात कुठेही 100 मिनिटं कॉल आणि 100 एसएमएस मोफत मिळणार आहेत.

रिलायन्स जिओने विविध बँकासोबत भागीदारी केली आहे. नेटबँकिंग आणि यूपीआय यासारख्या पर्यायश एटीएमचा वापर करून रिचार्ज करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. अनेक युजर्स रिचार्ज करण्यात असमर्थ आहेत. अशा कठीण स्थितीत त्यांना टेलिकॉम सेवेची गरज आहे. त्यासाठी जिओ अतिरिक्त प्रयत्न करत आहे, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

या बँकाच्या एटीएममधून होणार रिचार्ज
एटीएम रिचार्जची सुविधा एयूएफ बँक, Axis बँक, डीसीबी बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, आयडीएफसी बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये उपलब्ध असणार आहे. जिओने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत घोषणा केली आहे. एटीएमचा वापर करून रिचार्ज कसा करायचा याच्या स्टेप्सही कंपनीने सांगितल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या