जिओचा ग्राहकांना दणका; सर्वात स्वस्त प्लॅन केला बंद!

1665

रिलायन्स जिओने 6 डिसेंबरला टेरिफ प्लॅनमध्ये बदल केले होते. यावेळी कंपनीने कोणत्याही प्लॅनची किंमत वाढवली नव्हती. कंपनीने कोणत्याही प्लॅनची किंमत वाढवली नसली तरी सर्वात स्वस्त 49 रुपयांचा प्लॅन जिओने बंद केला आहे. आता जिओचे प्लॅन 75 रुपयांपासून सुरू होणार आहेत. गेल्या महिन्यात जिओने ग्राहकांसाठी नवे ऑल इन वन प्लॅन जाहीर केले होते. 75 रुपयांचा प्लॅन त्यापैकीच एक आहे.   आता ग्राहकांना रिचार्जसाठी 99,153,297,594 रुपयांचे प्लॅन आहेत. मात्र, ग्राहकांना नॉन जिओ मिनट्ससाठी आययूसी टॉपअप करावे लागणार आहे.

रिलायन्स जिओच्या जिओफोनची किंमत 1500 एवढी कमी असल्याने अनेक ग्राहक जिओकडे आकर्षित झाले होते. या फोनसाठी 49 रुपयांचा रिचार्ज असल्यामुळे ग्राहकांना चांगला फायदा मिळत होता. या प्लॅनमध्ये जिओद्वारे एफयूपी लिमिटशिवाय अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 28 दिवसांसाठी 1 जीबी डेटा देण्यात येत होता. मात्र, आययूसी टॉप अप वॉउचर आल्यावर 49 रुपयांचा प्लॅन विकात घेणाऱ्या ग्राहकांना आययूसी टॉप अप रिचार्ज विकत घेण्याची गरज भासत होती.

आता जिओने सर्वात स्वस्त असलेला हा 49 रुपयांचा प्लॅनच बंद केला आहे. जिओने 6 डिसेंबरला टेरिफ प्लॅन अपडेट केले होते. हा प्लॅन बंद झाल्याने जिओफोनच्या प्लॅनची किंमत आता 75 रुपयांनी सुरू होत आहे. गेल्या महिन्यात जिओने जिओफोनसाठी ऑल इन वन रिचार्ज प्लॅन आणले होते. या प्लॅनमध्ये नॉन जिओ मिनिट्सचाही समावेश आहे.  या प्लॅनची किंमत 75,125,155,185 रुपये आहे. 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड जिओ टू जिओ व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एमबी डेटा, एकूण 50 एसएमएस आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या