व्होडाफोन-आयडियासह जिओचा ग्राहकांना दणका, दरामध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेलिकॉम कंपन्या व्होडाफोन, आयडिया, एअरटेलसह रिलायन्स जिओने ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. या सर्व कंपन्यांनी फोन आणि डेटाच्या दरामध्ये जवळपास 40 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ केली आहे. 3 ते 6 डिसेंबरपासून याची अंमलबजावणी होणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा भूर्दंड बसणार आहे. ‘इकोनॉमिक्स टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या अॅडजस्टेड ग्रॉस रेवेन्यूवर प्रतिकूल निर्णयानंतर कंपनीला दुसऱ्या तिमाहीत 50,921 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यानंतर कंपनीने टॅरिफ शूल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हे शुल्क किती टक्क्यांनी वाढणार याची घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र आता हे शुल्क  40 टक्क्यांपेक्षा अधिक असणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) कंपनी दुसऱ्या तिमाहीत 50 हजार 921 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. यासह एअरटेल कंपनीला 23,045 कोटी रुपयांचा तोटा झाला. सरकार या टेलिकॉम कंपन्यांकडून जे एजीआर अर्थात एडजस्टेड ग्रॉस रिव्हेन्यू वसूल (महसूलातील काही भाग) करते त्यामुळे कंपन्यावरील बोजा वाढतो. म्हणून टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ शूल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, कंपनीने प्रीपेड ग्राहकांसाठी 2 दिवस, 28 दिवस, 84 दिवस आणि 365 दिवस मुदतीचे प्लॅन्सही जाहीर केले आहेत. हे नवे प्लॅन्स जुन्या प्लॅन्सपेक्षा 42 टक्क्यांनी महाग आहेत. जिओने देखील आपल्या सेवेचे दर वाढवले आहेत.