Hemant Soren News : सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले, मुख्यमंत्री सोरेन यांच्या जामीनावर हस्तक्षेप करण्यास नकार

झारखंड उच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले आहे. तसेच या याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. या केसच्या आणखी खोलात गेलो तर ईडीला अडचणीचे ठरेल अशा शब्दांत कोर्टाने ईडीचे कान टोचले आहे.

 

 

हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोरेन यांच्या जामिनाविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा कोर्टाने म्हटले की या प्रकरणात आम्ही आणखी खोलात जाऊ इच्छित नाही. जर आम्ही खोलात गेलो तर ईडीला अडचणीचे ठरेल. उच्च न्यायालयाने योग्य कारण देत जामीन मंजूर केला आहे असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

8 जुलैला ईडीने सोरेन यांना मिळालेल्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जामिन मिळाल्यानंतर सोरेन यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती