गोरगरीब हिंदूंवर बळजबरी, यूपीत धर्मांतराचे रॅकेट; पाकिस्तानने पुरवला पैसा, दोघा मौलानांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदू धर्मातील गरीबांना धर्मांतरासाठी बळजबरी करणाऱया रॅकेटचा उत्तर प्रदेश एटीएसने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सोमवारी मौलाना जहांगीर आणि उमर गौतम या दोघा मौलानांना अटक केली. त्यांना पाकिस्तानची ‘आयएसआय’ ही गुप्तचर यंत्रणा आणि विदेशातील आणखी एक मुस्लिम संघटना पैसे पुरवत होती. त्यांनी आतापर्यंत 1 हजार हिंदूंचे धर्मांतर केले असून त्यात मूकबधिर मुले आणि महिलांचे प्रमाण अधिक आहे. रॅकेटमध्ये 100 हून अधिक लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे.

कानपूर, बनारस, नोएडामध्ये धर्मांतराची सक्ती

धर्मांतराच्या रॅकेटने नोएडा डेफ सोसायटीच्या मूकबधिर शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचे जबरदस्तीने धर्मांतर केले. मागील दोन वर्षांपासून कानपूर, बनारस आणि नोएडामध्ये धर्मांतरासाठी सक्ती करण्याचे प्रकार सुरू आहेत. धर्मांतर केलेल्या एक हजार महिला व मूकबधिर मुलांच्या नावांची यादी एटीएसच्या हाती लागली आहे. रॅकेटने कानपूरच्या एका मुलाला दक्षिणेकडील शहरात नेले. एटीएसकडून त्या मुलाचा शोध घेतला जात आहे.