
‘धर्म हाच संपूर्ण सृष्टीचा ड्रायव्हर आहे. आपल्या सर्वांना चालवणारी धर्म हीच एकमेव शक्ती आहे. मला आणि नरेंद्र मोदी यांनाही धर्मच चालवतो. धर्माच्या गाडीत बसणाऱयांचा अपघात कधीच होणार नाही,’ असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केले. देश धर्मनिरपेक्ष असू शकतो, मात्र मनुष्य किंवा सृष्टीतील कुठलीही वस्तू धर्माशिवाय चालत नाही. प्रत्येकाचा एक धर्म असतो. निधर्मी वगैरे कोणी असू शकत नाही,’ असा दावा भागवत यांनी केला.
तोपर्यंत हिंदुस्थान विश्वगुरू बनून राहील!
हिंदुस्थानला संत, महात्म्यांकडून मार्गदर्शन मिळत आले आहे. आपल्याकडे पूर्वजांचा वारसा आहे. प्रत्येकाच्या नसानसात धर्म आहे. जे ज्ञान आणि अध्यात्म आपल्याकडे आहे, ते जगाकडे नाही. त्यामुळे हा धर्म जोपर्यंत हिंदुस्थानला चालवेल तोपर्यंत हिंदुस्थान विश्वगुरू असेल, असे ते म्हणाले.


























































