
गृह कर्ज आणि वाहन कर्जासह विविध कर्जे स्वस्त होणार नाहीत. कारण रिझर्व्ह बँकेने या वेळी व्याजदरात बदल केला नाही. आरबीआयने 5.5 टक्के हेच व्याजदर कायम ठेवले आहेत. त्यामुळे कर्ज स्वस्तही होणार नाहीत आणि तुम्हाला तोच ईएमआय भरावा लागेल.दरम्यान, टॅरिफ आणि व्यापार करारावरील अनिश्चितता यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.