Rajapur News – राजापूर तालुक्यात 101 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

प्रातिनिधिक फोटो

राजापूर तालुक्यातील 101 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गामध्ये 35, नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी 14 आणि दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती जमाती असे 101 पैकी 51 ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले.

सरपंच पदाच्या झालेल्या आरक्षण सोडतीला तहसिलदार विकास गंबरे यांच्यासह तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सरपंच पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार मोठ्यासंख्येने उपस्थित होते. दरम्यान, एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये सलग दोन-तीन टर्म एकच आरक्षण राहत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत मंदार सप्रे, संजय सुतार यांनी आरक्षण सोडतीच्या प्रशासकीय प्रक्रीयेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. यावेळी तहसिलदार गंबरे यांनी योग्य पद्धतीने आरक्षण सोडत प्रक्रीया राबविली जात असल्याचे स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये संतोष तांबे, श्री. मटकर आदींनीही भाग घेतला.

सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री – आजिवली,दसूर, हसोळतर्फे सौंदळ, चुनाकोळवण, जैतापूर, तळगाव, आडवली, नाटे, कोतापूर, हातिवले, आंगले, ताम्हाणे, वाटूळ, झर्ये.

नागरिकांचा मागास प्रवर्ग – ओशिवळे, उपळे, धाऊलवल्ली, मंदरूळ, डोंगर, वाल्ये, कोंड्येतर्फे सौंदळ, येळवण, मोरोशी, पांगरे बु, सोलगाव, साखरीनाटे, सागवे.

सर्वसाधारण स्त्री – ओझर, हातदे, जुवाठी, राजवाडी, शेढे, भालावली, हरळ, कोदवली, रायपाटण, तुळसवडे, दळे, करक, मोसम, सौंदळ, वडदहसोळ, देवीहसोळ, कारवली, माडबन, ससाळे, खडी कोळवण, धोपेश्वर, अणसुरे, पाचल, खरवते, खिणगिणी, गोवळ, कशेळी, पांगरे खुर्द, महाळुंगे, कोंड्येतर्फे राजापूर, गोठणे दोनिवडे, कुवेशी, प्रिंदावण, शिवणे खुर्द, तेरवण.

सर्वसाधारण – आंबोळगड, कोंडसर बुद्रुक, परटवली, वडवली, ओणी, मिठगवाणे, पेंडखळे, कणेरी, भू, मूर, तळवडे, मोगरे, चिखलगांव, मिळंद, तारळ, काजिर्डा, देवाचे गोठणे, नाणार, वाडापेठ, कोळंब, दोनिवडे, निवेली, विल्ये, साखर, जुवै जैतापूर, पडवे, येरडव, शीळ, जवळेथर, परुळे, फुफेरे, शेजवली, कुंभवडे, पन्हळे तर्फे सौंदळ, उन्हाळे, कोंडीवळे.