विकासदर घटला! रिझर्व्ह बँकेचे पत धोरण, व्याजदर जैसे थे; ग्राहकांना दिलासा नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेचा जबर फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला असून रिझर्व्ह बँकेने आपला अंदाजित विकास दर 10.5 टक्क्यांवरून 9.5 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. दरम्यान, पत धोरणात सलग सहाव्यांदा रेपो रेट 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के ‘जैसे थे’ ठेवला आहे. त्यामुळे गृहकर्जासह इतर कर्जांवरील व्याजदर कायम राहणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी द्विमासिक पत धोरणाची आज घोषणा केली. तत्पूर्वी जून आणि जुलै महिन्यासाठी पत धोरण निश्चित करण्याकरिता पत धोरण समितीची तीन दिवसांची बैठक झाली. समितीतील सदस्यांनी एकमताने रेपो रेट 4 टक्के कायम ठेवण्यास मंजुरी दिली. त्यामुळे कर्जांवरील व्याजदर ‘जैसे थे’ राहणार आहे.

अनिश्चिततेमुळे लोकांची खरेदीकडे पाठ

z कोरोनामुळे अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे मत ‘केअर रेटिंग्ज’ने नोंदविले आहे.

z अत्यावश्यक बाबी सोडून इतर वस्तूंसाठी खर्च करण्याची लोकांची मानसिकता नाही. वाहन पिंवा मोठय़ा वस्तूंची खरेदी टाळून लोक आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे तर वस्तूंची मागणी कमी होताना दिसत आहे. मागणी वाढविण्यासाठी वित्तीय उपाययोजना सरकारलाच कराव्या लागतील असे एलआयसी म्युच्युअल फंडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मर्झबान इराणी यांनी सांगितले.

पतधोरणात काय म्हटले?

  • कोरोनाच्या दुसऱया लाटेची व्याप्ती मोठी होती. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. कडक निर्बंधांमुळे व्यवसाय, उद्योगांना फटका बसला. त्यामुळे उत्पन्न घटले तसेच बॅकांची वसुलीही कमी झाली.
  • जोवर कोरोनाचे संकट जात नाही तोवर आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. त्यामुळे 2021-22 या चालू आर्थिक वर्षात अपेक्षित विकास दर (जीडीपी) 9.5 टक्के राहील. यापूर्वीच्या आरबीआयचा अंदाज 10.5 टक्के इतका होता.
  • किरकोळ बाजारात (रिटेल) महागाईचा दर 5.1 टक्के राहील असा अंदाज आहे.