
चंद्रपूर शहरात मधमाशांच्या हल्ल्यात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर मधमाशांच्या हल्ल्यात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राच्या आत असलेल्या मैदानावर ही घटना घडली. मधुकर रंगारी (65) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव असून ते सिन्हाळा या गावातील रहिवासी आहे.
डीजेच्या आवाजाने मधमाशांचे मोहोळ उठले आणि हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते. मधमाशांच्या हल्ल्यामुळे मैदानावर एकच पळापळ झाली. खेळाडू सैरावैरा धावत सुटले. काही वेळाने माशा स्थिर झाल्यावर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात रंगारी यांचा मृत्यू झाला तर दोन जन गंभीर जखमी आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



























































