
कर्फ्यु सुरू होण्यापूर्वी आपले काम उरकले पाहिजे म्हणून धावपळीत गाडीवर घरी जाणारे सेवानिवृत्त शिक्षक उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स वर यधडकले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाईत घडली. या भीतीने बीड जिल्ह्यात अपघात घडल्याची ही दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी माजलगावमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
अंबाजोगाई येथील नागझरी रस्त्यावर असणाऱ्या भगवानबाबा चौकात आज दुपारी मूळ धारूर येथील रहिवासी असणारे सेवा निवृत्त शिक्षक गोवर्धन मुंडे हे सध्या अंबाजोगाईत वास्तव्यास होते. संचारबंदी मध्ये सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत शिथिल होते. या वेळेत भाजीपाला घेऊन मोठ्या धावपळीत घराकडे निघाले असताना त्याची मोटारसायकल पेट्रोल पंपाजवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हलवर धडकली यात गोवर्धन मुंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कर्फ्यु पुन्हा सुरू होण्यापूर्वी काम उरकण्याच्या घाईत बीड जिल्ह्यात हा दुसरा बळी आहे. दोन दिवसांपूर्वी माजलगाव मध्ये ही एकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.





























































