मेघालय व झारखंड न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी रेवती मोहिते डेरे व महेश सोनक

court

मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तीं रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती महेश सोनक यांची मेघालय व झारखंड न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींपदी नेमणूक करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलीजियमची नुकतीच बैठक झाली त्यावेळी त्यांच्या शिफारशीचा निर्णय घेण्यात आला होता. शिफारशीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे या मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. 21 जून 2013 रोजी त्यांची उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली तर 2 मार्च 2016 रोजी त्यांना कायमस्वरूपी न्यायमूर्तीं करण्यात आले. न्यायमूर्ती महेश सोनक हे मुंबई उच्च न्यायालयातील दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. 21 जून 2013 रोजी अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी राज्य सरकार आणि विविध महामंडळांचे विशेष वकील म्हणूनही काम केले आहे.