रियाची तिसऱ्या दिवशीही चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तिसऱ्या दिवशी सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवतीची चौकशी केली. 9 तास चौकशी केल्यानंतर रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवती पोलीस संरक्षणात सांताक्रूझ येथील घरी गेले.

चौकशीसाठी आलेल्या सीबीआयच्या पथकाने आज रियाला पुन्हा चौकशीसाठी बोलावले होते. सकाळी साडे दहाच्या सुमारास रिया पोलीस बंदोबस्तात डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये आली होती. तिला सीबीआयने सुशांतबाबत प्रश्न विचारले होते. काही प्रश्नांना तिने उत्तरे दिली. तसेच शौविकची सीबीआयने चौकशी केली. तिची सीबीआय पुन्हा चौकशी करणार आहे.

येत्या काही दिवसात सीबीआय सुशांतच्या बहिणीला देखील चौकशीसाठी बोलावणार आहे. त्याच्या चौकशीतून काही माहिती सीबीआयला मिळेल. तर गौरव आर्या सोमवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहे.

2017 नंतर रिया चक्रवर्तीशी संपर्क नाही – गौरव आर्या
पणजी : बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात रिया चक्रवर्तीच्या वॉट्स एप्प चॅटमधून ड्रग्ससंदर्भात चर्चेत आलेल्या गोव्यातील हॉटेल उद्योजक गौरव आर्याने 2017 नंतर आपला रिया चक्रवर्ती सोबत कोणताच संपर्क आलेला नाही. आपण सुशांत सिंह राजपूतला ओळखत नसून या प्रकरणात आपल्याला का गोवण्यात आले हेच आपल्याला कळत नसल्याचा दावा केला आहे.

गौरव आर्याचे उत्तर गोव्यातील हणजुणे किनाऱ्याजवळ टॅमरींड नावाचे हॉटेल आहे. शिवोली येथील एका आलीशान अपार्टमेंटमध्ये त्याने एक फ्लॅटदेखील भाड्याने घेतला आहे. गौरवचे नाव समोर आल्यापासून मीडियाचे पत्रकार त्याच्या हॉटेल आणि घरासमोर ठाण मांडून बसले होते मात्र गौरव त्यांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. 1017 नंतर रियाशी आपला संपर्वâ नसून या प्रकरणात आपले नाव का गोवण्यात आले हे आपल्याला समजले नाही असे तो म्हणाला.