
सीएनजीच्या दरात गेल्या काही महिन्यात चार ते पाच वेळा दरवाढ झाल्याने त्याविरोधात रिक्षा व काळी पिवळी टॅक्सी चालक आणि मालकांच्या उत्पन्नावर त्याच्या परिणाम होत आहे. त्यामुळे ऑटो रिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने मंगळवारी सकाळी 11 वाजता वांद्रे-कुर्ला-संकुल येथील महानगर गॅस लिमिटेडच्या मुख्यालयावर मोर्चा नेण्याचे ठरविले आहे. यात मुंबई व आजूबाजूच्या क्षेत्रातील रिक्षा व टॅक्सी चालक सहभागी होणार असल्याने मुंबई आणि महानगर क्षेत्रातील प्रवाशांना उद्या ऑटो रिक्षा मिळताना अडचणी येण्याची शक्यता आहे.
सीएनजी इंधनावर ऑटो रिक्षा आणि टॅक्सी व्यवसाय अवलंबून आहे. प्रदूषण कमी होण्यासाठी सर्व टॅक्सी व रिक्षा चालकांना पेट्रोलऐवजी सीएनजी इंधनाचे परिवर्तन करून घेतले आहे. पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी स्वस्त असल्याने रिक्षा व टॅक्सी चालकांनाही फायदा होत होता. परंतू बदललेली आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे सीएनजीची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे सीएनजीचे दर पाच वेळा वाढविण्यात आल्याने रिक्षा चालक आणि मालकांचे धंद्याचे गणित बदलले आहे. या आंदोलनामुळे रिक्षा मिळताना मंगळवारी प्रवाशांना अडचणी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



























































