अंबानींच्या कार्यक्रमात मराठी गाण्यावर थिरकली रिहाना, पाहा व्हिडीओ

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग कार्यक्रम सध्या गुजरातमधील जामनगर येथे सुरू आहेत. या कार्यक्रमासाठी देश विदेशातून सेलिब्रिटी जामनगरमध्ये पोहोचले आहेत. यात सर्वाधिक चर्चा आहे ती पॉप स्टार रिहाना हिची.

रिहानाने अनंत व राधिका यांच्या प्री वेडिंग ब्लास्टमध्ये परफ़ॉर्म केलं. शनिवारी सोशल मीडियावर तिच्या परफॉर्मन्सचे व्हिडीओ व्हायरल होत होते. यात रिहानाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात ती अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत झिंगाट या प्रसिद्ध मराठी गाण्यावर नाचाताना दिसत आहे.

या व्यतिरिक्त रिहानाचा एअरपोर्टवर पोलीस व पॅपाराझींसोबत फोटो काढतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.