रितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन

57

सामना ऑनलाईन । मुंबई

रविवारी सर्व गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. अभिनेता रितेश देशमुख याच्या घरी देखील दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दहा दिवस परंपरागत गणेशोत्सव साजरा केल्यानंतर रितेशने विसर्जन मात्र इकोफ्रेंडली पद्धतीने केले. रितेशने त्याच्या घराच्या परिसरात एका ड्रममध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन केले. रितेशने अशाप्रकारे बाप्पाचे विसर्जन करत त्याच्या चाहत्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.

रितेशने गणपती विसर्जनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश देशमुख व त्याचा भाऊ दोघे गणपती बाप्पाचे विसर्जन करताना दिसत आहेत. रितेशच्या या इको फ्रेंडली पद्धतीचे सोशल मीडियावर देखील स्वागतच करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या