लय भारी! आईच्या जुन्या साडीपासून रितेशने शिवला कुर्ता!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीनिमित्त अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत दिलेल्या शुभेच्छा सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरतायत. त्याचे कारणही तसेच आहे. या व्हिडिओत रितेश आणि त्याच्या दोन्ही मुलांनी एकाच रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला आहे. विशेष म्हणजे हा कुर्ता रितेशने त्याच्या आईच्या जुन्या साडीपासून तयार केला आहे. ’आईची जुनी साडी, मुलांसाठी दिवाळीचे नवीन कपडे’ अशी कॅप्शन रितेशने या व्हिडिओला दिली असून त्याची पत्नी जेनेलीया हिने हा व्हिडियो शूट केला आहे. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत असून रितेशच्या लई भारी आयडियाचे कौतुक होत आहे.