जिंतुर-बामणी रोडवरील अपघातात एकजण ठार

425

परभणीतील जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंगलगाव तांडा या जवळील वळणावर दुचाकी आणि गाडीत धडक झाली. रविवारी सकाळी 9 वाजता हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील प्रगतशील शेतकरी शंकर गोविंदराव शिंदे ( वय 55,रा. अंबरवाडी, ता.जिंतूर) यांचा मृत्यू झाला.

अंबरवाडीहून दुचाकीने शंकर शिंदे जिंतुर येथे कामानिमित्त जात होते. त्याचवेळी जिंतुरहून अंबरवाडीकडे जाणारी चारचाकी अंगलगाव तांडाजवळ शिंदे यांच्या दुचाकीला धडकली. या अपघातात शिंदे अतिशय गंभीर जखमी झाले होते. त्यांना जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल नेण्यात आले. तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच बामणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भास्करराव काशिकर याच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.पठाण, एच.पी.नागरगोजे, शिवाजी भोसले आदी पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शिंदे यांना रुग्णालयात हलवले. या प्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद केली नसल्याची माहिती बामणी पोलीसांनी दिली. शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंड असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या