लातूरजवळील अपघातात वीज उपकेंद्रातील तंत्रज्ञानचे निधन

1455

लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील ममदापूर पाटीजवळ दुचाकी व टेम्पोच्या अपघातात येथील वीज उपकेंद्रातील तंत्रज्ञ कौस्तुभ भास्करराव लिंबुटे याचे निधन झाले. यामुळे वडवळ नागनाथ परिसरात शोककळा पसरली आहे. महावितरण कंपनीच्या येथील विज उपकेंद्रातील तंत्रज्ञ कौस्तुभ भास्करराव लिंबुटे (वय 27) हे सोमवारी सकाळी लातूरहून आपल्या दुचाकीवरुन वडवळला कामावर जात होते. यावेळी घारोळा येथील मालवाहू टेम्पो लातूरकडे जात असताना लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील महमदापूरपाटीजवळ असलेल्या ऑइल मिलसमोर टेम्पोने दुचाकीला धडक दिली. यावेळी टेम्पो उलटून झालेल्या अपघातात दुचााकीवरील कौस्तुभ लिंबुटे याच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातूरला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

महावितरण कंपनीत कौस्तुभ लिंबुटे 2014 पासून नोकरीला होते. 2017 पासून येथील 33 के.व्ही वीज उपकेंद्रात तंत्रज्ञ म्हणून कामावर होते. सोमवारी दुपारी लातूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी येथील बेलपत्री स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात तीन काका, आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. घरात एकूलता एक मुलगा असलेल्या कौस्तुभचे अपघाती निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या