शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे शिवडीतील रस्त्याचे काम सुरू

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे अटल सेतू शिवडीजवळील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यावरील मुख्य नाल्याचा भाग कोसळल्यामुळे रोडवर मोठा खड्डा पडल्यामुळे सदर रोड गेले 15 दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे सदर रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी निर्माण होत आहे. याची दखल घेऊन या विभागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका, एम.एम.आर.डी.ए., मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याशी पत्रव्यवहार करून या नाल्याचे बांधकाम लवकरात लवकर चालू करण्यासाठी पाठपुरावा केला. याची दखल घेत आजपासून मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सदर नाला बांधणीचे काम चालू करण्यात आले आहे. आज सदर ठिकाणी जाऊन चालू झालेल्या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक सचिन पडवळ, स्थानिक शाखाप्रमुख हनुमंत बैजू हिंदोळे यांच्यासह शिवडी पूर्व विभागातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.