
सामना प्रतिनिधी । लातूर
रेणापूर तालूक्यातील पळसी ते गरसुळी रसता सुधारणेच्या ६ लक्ष ४० हजार रुपयाच्या कामात ४ लाख ३४ हजाराचे अतिप्रदान केल्याप्रकरणी शाखा अभियंता मुरलीधर माधवराव साळुंके यास निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई लातूर जिल्हा परिषदेच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी केली आहे.
पंचायत समिती रेणापूर पळसी ते गरसुळी रस्ता सुधारण करण्याच्या कामाची रक्कम ११ लाख ७४ हजार असताना आणि प्रत्यक्षात ६ लाख ४० हजार रुपयांचे काम झाले असताना १ लक्ष रुपये शिल्लक ठेऊन ४ लाख ३० हजार रुपयांचे जागा प्रदान शाखा अभियंता मुरलीधर माधवराव साळुंके यांनी केले. यात मोजमापामध्ये वेगवेगळ्या स्तरावर ते दोषी आढळल्याचे सिध्द होत असून नियम ३ चा भंग केल्याने जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपिल) १९६४ मधील नियमानुसार शाखा अभियंता मुरलीधार साळुंके यांना तात्पुरते निलंबित केल्याचे आदेश उपकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद लातूर यांनी २३ मे २०१८ रोजी काढल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मुरलीधर साळुंके यांच्या कार्य काळातील आशी अनेक प्रकरणे असून सर्व प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.



























































