रोडीजचा 17 वा सीझन; 15 जानेवारीला पुण्यात निवड फेरी

1044

ओप्पो एमटीक्ही रिव्होेल्युशनसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यलो प्रूट ज्यूस सहप्रायोजित स्पर्धा जानेवारीत दिल्ली, चंदिगढ, कोलकाता आणि पुणे शहरांत रंगणार आहे. रोडीज रिव्होेल्युशनच्या 17 व्या सीझनमध्ये क्रांती घडवून आणून सामाजिक बदल करण्याचे उद्दिष्ट आहे. एक खास उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेकून साकारलेल्या या कार्यक्रमातून तरुणाईला नव्या आव्हानासाठी तयार करण्याचा चंग या ब्रॅण्डने बांधला आहे. अंगावर काटा आणणारे टास्क, नाटय़मय कळणे आणि अद्वितीय धाडस यासह रोडीज रिव्होेल्युशन पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी बनणार आहे. रोडीजमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणाईला प्रवेश अर्जांचे आवाहन करण्यात आले असून पुणे येथे 15 जानेवारीला प्रवेश फेरी होणार आहे. प्रवेशाचे पासेस http://bit.ly/RoadiesAuditions येथे उपलब्ध आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या