बावधन येथे पावणे दोन लाखांची घरफोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून फ्लॅटमधून एक लाख 70 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरदरम्यान बावधन खुर्दमधील विज्ञाननगर रोड घडली. रमेश अण्णाजी धर्मट्टी (वय 68, रा. विज्ञाननगर रोड, बावधन) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा फ्लॅट 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरदरम्यान बंद होता. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडूले आणि ते आत शिरले. बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातून एक लाख 70 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.